कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेससह राजकीय पटलावर खळबळ


नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाचेच ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. पण १६० पेक्षा जास्त जागा भाजपलाही जिंकता येणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी लोकसभा निवडणुकांच्या मध्यातच पक्षाला स्वतःच्या बळावर बहुमत मिळणार नसल्याचे म्हटल्यामुळे काँग्रेस पक्षासह राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. पण यावेळी भाजपला मोठा फटका बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

युपीए यावेळी सरकार स्थापन करेल, असे सिब्बल यांनी म्हटले आहे. पण युपीएचा पंतप्रधान पदाचा दावेदार राहुल गांधी असतील का ? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले. २७२ जागा काँग्रेसला मिळाल्या तर प्रश्नच उरत नाही. पण कमी जागा मिळाल्यास राहुल गांधीं बद्दल सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment