एचबीओ बनवला क्रीडा इतिहासातील मोठ्या बलात्कार प्रकरणावर चित्रपट


क्रीडा इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेल्या व भयावह बलात्काराची घटना एचबीओ नेटवर्कने छोट्या पडद्यावर आणली आहे. शेकडो तरुणींची व्यथा त्यांचा नवा माहितीपट ‘अॅट द हार्ट ऑफ गोल्ड : इनसाइड द यूएसए जिम्नॅस्टिक्स स्कँडल’ हा मांडतो. सुमारे २० वर्षे विद्यापीठापासून ते आॅलिम्पिक संघातील शेकडो महिला जिम्नॅस्टचे अमेरिकी जिम्नॅस्टिक्स टीमचा डॉक्टर लॅरी नासेरने लैंगिक शोषण केले. त्याला याप्रकरणी १७५ वर्षांची शिक्षा मिळाली असून, तो कारागृहात आहे.

पण ही कथा शोषणाच्या शिकार झालेल्या तरुणींसाठी अजून संपलेली नाही. कहाणी संपूदेखील शकणार नाही, असे हा चित्रपट सांगतो. कारण त्यांच्या भावनांवर नासेरच्या दुष्कृत्यांनी खोल आघात केला आहे. हे प्रकरण १९९७ मध्ये समोर आल्यानंतर नासेरवर बंदी का लादण्यात आली नाही? तसेच संबंधित क्रीडा संघटनांनी पीडित महिला व तरुणींच्या संरक्षणासाठी कोणत्याही उपाययोजना का केल्या नाहीत? याचे उत्तर मात्र हा माहितीपट देत नाही.

अमेरिकी जिम्नॅस्टिक्स (यूएसएजी) व मिशीगन स्टेट युनिव्हर्सिटीचे (एमएसयू) कोच व प्रशिक्षक जखमी खेळाडू तरुणींना नासेरकडे पाठवायचे. येथेही नासेर काम करायचा. अनेक जिम्नॅस्टनी यूएसएजीविरुद्ध खटले दाखल केले असून, कोणतेही पाऊल या प्रकरणात न उचलल्यामुळे त्यांचा राष्ट्रीय दर्जा काढला जाऊ शकतो. पीडादायक विजयासमान नासेरची शिक्षा आहे. कारण या घटनांना कारणीभूत संघटनांची जबाबदारी अद्यापही निश्चित केलेली नाही, असे पीडितांना वाटते. आम्हाला अजूनही पूर्ण न्याय मिळालेला नाही.

माझ्याबाबत घडलेल्या घटनेची मी तक्रार केली तेव्हा बलात्काराच्या शिकार झालेल्या शेकडो मुलींचा जन्मही झालेला नव्हता, असे १९९७ मध्ये नासेरच्या वासनेची शिकार झालेल्या मुलींपैकी एक असलेली एमएसयूची माजी जिम्नॅस्ट लेरिसा बॉयसने सांगितले. जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात परिपूर्ण होण्यासाठीच्या स्पर्धेत नासेरसारख्या शिकारीसाठी असलेल्या अनुकूल वातावरणाकडे कुणीही लक्ष दिले नाही. या संस्कृतीत अजूनही बदलाचा गरज आहे. धावपटू विशेषत: मुले जेव्हा लैंगिक शोषणाच्या तक्रारी करतात, तेव्हा नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावे, अपेक्षाही बॉयसने व्यक्त केली.

Leave a Comment