सर्वसामान्य लोकही करू शकतील सोन्याच्या कमोडचा वापर!


जपानमध्ये एक सोन्याचा बाथटब लावल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आपण वाचली होती. आता सोन्याचा कमोड यूनायटेड किंगडममधील ब्लेनहीम पॅलेसमध्ये लावला जाणार आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांच्या कक्षाजवळ हा कमोड लावला जाणार आहे. या संदर्भातील वृत्त ‘द गार्डियन’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, १८ कॅरेट सोन्यापासून हा कमोड तयार करण्यात आला आहे.

माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांचे ऑक्सफोर्डशायर स्थित ब्लेनहीम पॅलेस हे घर आहे. ब्लेनहीम आर्ट फाउंडेशनचे संस्थापक स्पेंसर चर्चिल यांनी सांगितले की, खास व्यवस्था या टॉयलेट सीटच्या सुरक्षेसाठी केली जाईल. मॉरिजो कॅटिलेन यांनी हा कमोड तयार केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, येथील सामान्य नागरिकही या कमोडचा वापर करू शकतात. पण आधीच त्यासाठी बुकिंग करावी लागणार आहे. याआधीही या कमोडची चर्चा रंगली होती. त्यावेळी हा कमोड गुगेनहिम संग्रहालयाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्याचा इच्छा व्यक्त केली होती.

हा सर्वसामान्य जनतेसाठी खुला केला जाईल, कारण या इमारतीला यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंदवले आहे. ब्लेनहीम पॅलेसमध्ये लावली जाणारी ही टॉयलेट सीट तिथे होणाऱ्या प्रदर्शनाचा भाग असणार आहे. एका रिपोर्टनुसार, हे सोन्याचे कमोड आतापर्यंत १ लाख लोकांनी पाहिले असून सोन्यापासून तयार या कमोडसोबत सेल्फी काढला.

Leave a Comment