दिग्विजय सिंहांसाठी प्रचार करणार अग्निवेश स्वामी


भोपाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा भाजप कार्यकर्त्यांच्या रडारावर असलेले स्वामी अग्निवेश यांनी गंभीर आरोप केला आहे. गैरजबाबदारपणाची पंतप्रधान मोदी यांची राहणी असून या जगात त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान नसल्याचेही अग्निवेश यांनी म्हटले आहे. अग्निवेश स्वामी भोपाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावरही निशाणा साधला.

विविध पक्षांच्या प्रचाराला लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उधाण आले असून राजकारण्यांची विविध वक्तव्ये समोर येत आहेत. आता स्वामी अग्निवेश यांच्या वक्तव्याची त्यातच भर पडली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावरही पत्रकार परिषदेत त्यांनी टीकास्त्र सोडले.

देशात ज्याप्रकारचे काम प्रज्ञा ठाकूर यांनी केले ते अत्यंत निंदनीय आहे. साध्वी म्हणवून घेण्याच्या लायकीच्या त्या नाहीत. ठाकूर यांना अत्यंत विचारपूर्वक मोदी आणि शहांनी उमेदवारी दिली आहे. देशासोबतच संपूर्ण आर्य समाजाला संघामुळे धोका असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. आपले १ लाखाहून जास्त समर्थक प्रज्ञा ठाकूर यांच्या विरोधात प्रचार करतील, असेही अग्निवेश म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनाही स्वामींनी घेरले होते. सर्जिकल स्ट्राईवरून त्यांनी मोदींना प्रश्न विचारला, की ते चक्क लोकांना देशद्रोही ठरवतात. जनता विरोधी मोदींचे आचरण आहे. मागच्या निवडणूकांमध्ये त्यांनी ज्या घोषणा केल्या, त्यांची पुर्तता त्यांनी केली नसल्याचेही अग्निवेश यावेळी म्हणाले.

स्वामींनी प्रज्ञा ठाकूर यांनी हेमंत करकरेंवर केलेल्या विधानावरूनही त्यांना लक्ष्य केले. देशातील जनतेने त्यांच्या या विधानानंतरही त्यांना मतदान केले तर हा करकरेंचा अपमान असेल, असेही स्वामी म्हणाले. स्वामी अग्निवेश यांच्यावर अनेकदा भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या अत्यंयात्रेत त्यांना मारहाण करण्यात आली होती.

Leave a Comment