मोदींची टरबूजाला तर राहुलची स्ट्रीट फूडला पसंती


निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवसात पंतप्रधान मोदी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन महिने देशभर विविध ठिकाणी दिवसाकाठी चार चार मोठ्या सभा घेत असूनही ताजेतवाने दिसत आहेत. इतक्या धावपळीत हा उत्साह कसा टिकून राहतो याची अनेकांना उत्सुकता असेल. मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या दिवसात मोदी प्रामुख्याने टरबूज खाण्याला पसंती देत आहेत तर राहुल गांधी मात्र धाब्यांवर जेवण उरकत आहेत. देशातील लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून सोमवारी राहुल गांधी याच्या अमेठीमध्ये तर १९ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी मध्ये मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे बडे नेते प्रचाराच्या धुमाळीत व्यग्र आहेत.

६९ वर्षीय मोदी दिवसाकाठी १८ तास काम करत आहेत. त्यात विविध ठिकाणच्या प्रचार सभा, सरकारी कामे, रोजच्या रात्री उशिराच्या राजकीय बैठका होत आहेत. रोजची मेल चेक करणे आणि आवश्यक त्या मेलची उत्तरे देणे हे काम सुरु आहेच. मोदी यांची स्वस्थ शरीर, स्वस्थ दिमाग यावर श्रद्धा आहे त्यामुळे या काळातही ते पहाटे योगाभ्यास नियमाने करतात व रोज पुरेसे पाणी मिळावे यासाठी तसेच चवीसाठी टरबूज खाण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. लिंबू पाणी पीत आहेत. रात्री अगदी हलके आणि साधे जेवण घेत आहेत. सायंकाळी वेळ असल्यास चहा आणि गुजराथी खांडवी असा आहार घेत आहेत. उन्हाळा असल्याने सुती कपडे घालण्यास त्यांनी अधिक पसंती दिली आहे.

या उलट राहुल गांधी यांचा फिटनेस फंडा खाद्यपदार्थांवर अवलंबून नाही तर व्यायामावर त्यांचा अधिक विश्वास आहे. यंदाच्या प्रचारसभात तेही खूपच आक्रमक झालेले दिसतात आणि मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सतत प्रवास सुरु असल्याने ते मिळेल तेथे धाब्यावर जेवण उरकत आहेत. सकाळी फळे, दही, कॉर्न नाश्त्यात घेणे त्यांना अधिक पसंत आहे. गेले दोन महिने ते सतत स्ट्रीट फूड खात आहेत आणि स्थानिक ठिकाणचे पाणी पीत आहेत. राहुल यांना कदाचित त्यांच्या नव्या वायनाड मतदारसंघामुळे नारळ पाणी पिण्याची नवी सवय जडली असून व्यायामाबाबत ते अतिशय दक्ष आहेत. त्यात प्रामुख्याने रनिंग करण्यावर त्याचा भर असून सध्याच्या धावपळीत रात्री १२ वा. सुद्धा ते १० ते १२ किमी रनिंग करतात असे समजते. त्याचबरोबर दिवसभराचा ताण सहन व्हावा यासाठी मेडिटेशन करत आहेत. विमान प्रवासात पुस्तके वाचत आहेत.

Leave a Comment