टायगर वूडला सर्वोच्च अमेरिकी नागरी सन्मान


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते सोमवारी व्हाईट हाउस मध्ये जागतिक कीर्तीचा गोल्फर टायगर वूड याला देशाचा सर्वात मोठा सन्मान, प्रेसिडेंशीयल मेडल ऑफ फ्रीडम देण्यात येत आहे. अमेरिकेचा हा सर्वोच नागरी सन्मान मिळविणारा तो चौथा गोल्फपटू ठरला आहे. गेल्या महिन्यात टायगरने मास्टर्स टूर्नामेंट जिंकल्यावर ट्रम्प यांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. ४३ वर्षीय वूडने एप्रिल मध्ये १० वर्षाच्या खंडानंतर अगस्ता मध्ये ५ वा मास्टर्स खिताब जिंकला आहे.


१९६३ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी या पुरस्काराची सुरवात केली होती. हा पुरस्कार मिळालेल्यात जॅक निकलॉस, अर्नाल्ड पाल्मर, पीजीए टूरचा पहिला अश्वेत खेळाडू चार्ली सिफोर्ड या गोल्फपटूंचा समावेश आहे. ट्रम्प यांचा वूडला हा सन्मान देण्याचा निर्णय वर्णद्वेषाच्या राजकारणाशी जोडला गेला असून वूड अश्वेत खेळाडू आहे. त्याचे वडील अश्वेत होते तर आई थायलंडची आहे. ट्रम्प यांची ओळख अश्वेत खेळाडूंचे समर्थक अशी नाही मात्र ते टायगर वूड्सचे चाहते आहेत.

वूडने गेल्या महिन्यात अगस्ता नॅशनल कोर्समध्ये करियरचा १५ वा मोठा खिताब जिंकला आहे. गेली ११ वर्षे त्याच्यासाठी अनेक अडचणी घेऊन आली. त्याच्या पाठीचे ऑपरेशन करावे लागले होते शिवाय वैयक्तिक आयुष्यात त्याला अनेक अडचणी आल्या होत्या. वूड म्हणतो मी गेली काही वर्षे ज्या अडचणींना तोंड देतो आहे, त्यानंतर विजय मिळविणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. वूडने १९९७, २००१, २००२, २००५ सालात मास्टर्स टूर्नामेंट जिंकली होती आणि त्यानंतर आता २०१९ मध्ये हा खिताब परत मिळविला आहे.

Leave a Comment