चीन मधील काही अजब चाली-रीती


चीन किंवा चायना हा देश आर्थिक दृष्ट्या प्रगतीशील देश असून, राजकीय आणि सैन्यबलाच्या दृष्टीने देखील बलवान देश समजला जातो. अनेक क्षेत्रांमध्ये ह्या देशाची बरोबरी करणे इतर बलाढ्य देशांना देखील अजून काहीसे अशक्यच ठरत आले आहे. ह्या देशाच्या संस्कृतीपासून, इथे सर्वसाधारणपणे रूढ असणाऱ्या चाली-रीती ह्या देशाची खासियत म्हणाव्या लागतील. ह्या चाली रीतींच्या बद्दल फारशी माहिती इतर देशातील रहिवाश्यांना नसते. ह्या चालीरीती काहीशा अजब आहेत असे मानावयास देखील हरकत नाही.

चीन देशामध्ये दिवसाकाठी कधीही झोपण्यास परवानगी आहे. मग तुम्ही रेल्वे स्टेशनवर असा, किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असा, तुम्हाला थकवा आल्यास अगदी ऑफिसमध्ये देखील अर्ध्या तासाची डुलकी काढण्याची परवानगी या देशाच्या कायद्याने दिलेली आहे. अगदी मुलांच्या शाळांमध्ये देखील अर्धा तास मुलांना झोप काढता यावी, म्हणून खास राखून ठेवलेला असतो. त्यामुळे दिवसाकाठी कधी ही अर्धा तास कुठे ही डुलकी काढणे शक्य आहे. येथील एक विशेष प्रथा अशी, की चीनमधील अनेक नागरिक आपल्या मुलांची नावे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांवरून ठेवतात. खेळाच्या नावावरून मुलाचे नाव ठेवले गेल्याने मुलाचे भविष्य उज्ज्वल होते अशी इथे मान्यता आहे.

संध्याकाळच्या वेळी टीव्ही सुरु झाला की प्रत्येकाला आपापल्या आवडीच्या चॅनलवरील मालिका पहायची असते. हे दृश्य आपल्याकडे घराघरामध्ये दिसून येत असते. पण चीनमध्ये मनोरंजन करणाऱ्या वाहिन्या मुळातच अतिशय मर्यादित असल्यामुळे बहुतेक घरांमध्ये संध्याकाळच्या वेळी एकच चीनी भाषेतील वाहिनी पाहण्यास मिळते. चीन देशामध्ये चीनी नवीन वर्षाच्या निमित्ताने चाळीस दिवसांची सुट्टी दिली जाते. याच सुट्टीच्या काळामध्ये बहुतेक चीनी नोकरदार नागरिक पर्यटनाला निघतात. या दिवसांमध्ये दर वर्षी सुमारे ३.७ मिलियन चीनी नागरिक भ्रमंतीसाठी बाहेर पडतात. चीनमधील अतिशय अजब पद्धत ही, की चीनमध्ये केवळ मजा किंवा सवय म्हणून मद्यपान करण्याची प्रथा नाही, तर इथे कामाच्या ठिकाणी काही कुचराई झाल्यास वरिष्ठ अधिकारी, संबंधित व्यक्तीला मद्यपान करण्याची शिक्षा देऊ शकतात. ही पद्धत चीनमध्ये सर्वामान्य आहे.

Leave a Comment