वादग्रस्त ‘बिकनी एअरलाइन्स’ जुलैपासून सुरू होणार भारतात


आपल्या नावापेक्षा सर्वाधिक ‘बिकिनी एअरलाइन्स’ नावाने व्हिएतनामची VietJet एअरलाइन्स ओळखली जाते. लवकरच ही एअरलाइन्स आपली सेवा भारतात सुरू करणार आहे. आपली फ्लाइट नवी दिल्ली ते व्हिएतनामच्या ची मीन्ह शहरापर्यंत असणार असल्याचे एअरलाइन्सने जाहीर केले आहे. जुलै किंवा ऑगस्टमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त डीएनएने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार नवी दिल्लीहून आठवड्यातून ४ दिवस या एअरलाइन्सची फ्लाइट्स उड्डाण करणार आहे. सेक्सीएस्ट मार्केटींगसाठी ही एअरलाइन्स ओळखली जाते. एक महिला उद्योजक ही एअरलाइन्स चालवते. न्यूएन थाई पॉंग थाओ असे त्यांचे नाव आहे.

एअरलाइनच्या सीईओ न्यूएन थाई पॉंग थाओ यांनी एअरहोस्टेसचा ड्रेस कोड निवडला आहे. त्या व्हिएतनामच्या पहिल्या बिलीनिअर महिला आहेत. एअरहोस्टेसला ही एअरलाइन्स फुटबॉल टीमच्या स्वागतासाठी लिंगरी परिधान करायला लावली होती. एअरलाइन्सच्या जगात सर्वात वादग्रस्त एअरलाइन्स पैकी ही एक आहे. काही देशात एअर होस्टेसने बिकिनी परिधान करण्यावर बंधने आहेत. तज्ज्ञांच्यामते ही एअरलाइन्स भारतात सुरू झाल्यावर मोठा वाद होऊ शकतो.

Leave a Comment