महेश भट्ट यांच्या ‘मार्कशीट’मध्ये हा नवोदित अभिनेता झळकणार


बी-टाऊनमध्ये मागील वर्षी त्याचप्रमाणे या वर्षी देखील अनेक स्टार किड्सने पदार्पण केले आहे आणि स्टार किड्सना घेऊन चित्रपट बनवण्याचा चंगच निर्मात्यांनी बांधला आहे. त्यातच आता लवकरच महेश भट्ट यांची निर्मिती असलेल्या ‘मार्कशीट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. नवोदित अभिनेता इमरान जाहीद याची या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून वर्णी लागली आहे.


आत्तापर्यंत बरेच चित्रपट बॉलिवूडमध्ये शिक्षण व्यवस्थेवर तयार झाले आहेत. ‘मार्कशीट’चाही समावेश या चित्रपटांध्ये होणार आहे. शिक्षण व्यवस्थेवर या चित्रपटातूनही भाष्य करण्यात येणार आहे. या चित्रपटात इमरान टॉपर विद्यार्थ्याची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचा पहिला लूक महेश भट्ट यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. इमरान जाहिदच्या चारही बाजूला या पहिल्या लूकमध्ये पुस्तकांची दुकाने आहे. या सोबतच बरेच कोचिंग क्लासेसचे असणारे पोस्टर, बॅनरसुद्धा दिसत आहे. शिक्षणाच्या काही मुद्द्यांवर आधारित असलेल्या या चित्रपटावर मागील काही दिवसापुर्वी वाद देखील सुरू होते.

Leave a Comment