नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदान झाले असून आता शेवटचे तीन टप्पे शिल्लक असतानाच बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर टीका करताना एका भाजप उमेदवाराची जीभ घसरली आहे. मायावती यांना भाजप उमेदवार बृजभूषण शरण सिंह यांनी थेट ‘गुंडी’ असे संबोधत नव्या वादाला तोंड फोडले आहे. मायावती यूपीची गुंडी’ असून त्यांना निवडणुकीनंतर तुरुंगात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे बृजभूषण यांनी म्हटले आहे.
निवडणुकीनंतर तुरुंगात जाणार बहनजी – भाजप उमेदवार
मला एका सभेमध्ये मायावतींनी ‘गुंड’ आणि ‘दहशतवादी’ म्हटले होते. पण, मायावती यूपीची गुंडी आहे. मला निवडणुकीनंतर तुरुंगात टाकण्याची भाषा त्यांनी केली होती. पण, प्रत्यक्षात निवडणुकीनंतर त्याच तुरुंगात जातील, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.
भाजप उमेदवार बृजभूषण हे माझ्या कार्यालयाची तोडफोड करण्यास जबाबदार असल्याचे मायावती यांनी म्हटले होते. यूपीतील गोंडा येथे एका सभेत काही दिवसांपूर्वी हे वक्तव्य त्यांनी केले होते. मायावती यांनी तेव्हा भाजप उमेदवार गुंड आणि दहशतवादी असल्याचे म्हटले होते. मायावती यांच्या या वक्तव्यावर बृजभूषण सिंह यांनी पलटवार केला आहे.