जावेद अख्तर माफी मागा अन्यथा घरात घुसून मारू – करणी सेना


मुंबई : नेहमीच कोणत्याही मुद्द्यावर गीतकार जावेद अख्तर आपले मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. पण अनेकदा ते त्याच्या याच स्वभावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडतात. जावेद यांनी नुकतेच भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बुरखा आणि घूंघट दोन्हीवर बंदी घालावी असे म्हटले होते. पण नव्या वादाला त्यानंतर तोंड फुटले आहे. या वक्तव्यामुळे आता जावेद अख्तर यांना करणी सेनेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. जावेद यांच्या विरोधात एक व्हिडिओ शेअर करत करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी त्यांना धमकी दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर करणी सेनेचा हा 45 सेकंदांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून सोलंकी यांनी यात म्हटले आहे कि, आपल्या मर्यादा जावेद यांना समजायला हव्या. राजस्थानसारख्या राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नये. 3 दिवसांच्या आत जावेद अख्तर यांनी त्यांचा या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा आमच्या विरोधाला तयार राहावे. करणी सेना अशा लोकांना चांगलंच ओळखते. अशा लोकांना करणी सेना कशाप्रकारे उत्तर देते ते जरा भन्साळीसाहेबांना एकदा विचारा. राजस्थानच्या संस्कृतीवर जर कोणी शंका उपस्थित केली तर करणी सेना त्या व्यक्तीचे डोळे काढून हातात देण्याची हिंमत ठेवते. जावेद अख्तर यांनी जर तीन दिवसांच्या आत माफी मागितली नाही तर करणी सेना त्यांना घरात घुसून मारण्यासही मागेपुढे पाहणार नाही.

Leave a Comment