निधनाच्या अफवेचे मुमताज यांच्याकडून खंडन


पत्रकार आणि चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी मुंबईतील एका रुग्णालयात मुमताज यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे ट्विट केल्यानंतर मुमताज यांच्या निधनाविषयी नाहटा यांनीही चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागितली आहे. सध्या लंडनमध्ये मुमताज असून त्यांची प्रकृतीही ठणठणीत आहे.

ट्विटरच्या माध्यमातून दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी ६० आणि ७०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांची प्रकृती सुखरुप असल्याची ही माहिती दिली. मुमताज यांच्या निधनाची अफवा पसरली होती. तर एका वृत्तवाहिनीशी बातचित करुन खुद्द मुमताज यांनीसुद्धा आपण धडधाकट असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही वर्षांपासून ७१ वर्षीय मुमताज लंडनमध्ये स्थायिक झाल्या आहेत. अशा प्रकारच्या अफवा का पसरवल्या जात आहेत हेच समजत नाही. अशा अफवा पसरवून कोणाला काय आनंद मिळतो, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान दुसऱ्यांदा मुमताज यांच्या निधनाची अफवा पसरली आहे. मुमताज यांच्या कुटुंबीयांनी देखील निधनाच्या अफवांवर संताप व्यक्त केला आहे. सध्या लंडनमधील घरी मी असून येथे मी मजेत आहे. माझ्या निधनाच्या अफवांमुळे माझे चाहते निराश होत असतील. मलाही स्वत:विषयीच्या अशा चर्चा ऐकून वाईट वाटते, असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment