15 दिवसांच्या चित्रिकरणासाठी पूजा हेगडेने मागितले एवढे कोटी !


निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरच्या मोहजोंदारो चित्रपटाद्वारे अभिनेत्री पूजा हेगडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती यात ऋतिक रोशनसोबत झळकली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला. असे असूनही दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये पूजाला काम देण्यासाठी निर्माते तयार आहेत.

यासंदर्भात आजतक या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार पूजाला वाल्मिकी चित्रपटासाठी फिल्ममेकरने अप्रोच केली आहे. लक्ष्मी मेननच्या भूमिकेसाठी तिला यात विचारण्यात आले आहे. जिगरठंडाचा हा चित्रपट रिमेक असल्याचे बोलले जात आहे. पण फक्त 15 दिवसांच्या शूटिंगसाठी पूजाने 2 कोटी मागितले आहे. पण यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निर्मात्यांनी अजून पूजाला एवढी रक्कम देण्यासाठी होकार दिला नाही.

गतवर्षी रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल ४’मध्ये पूजा दिसली होती. पूजा सह याचित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सॅनन, कृति खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल-4’ ची कथा पुनर्जन्मावर आधारित होती. पूजाने तमिळ चित्रपट ‘मुगमूदी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पूजा हेगडेचा तमिळ चित्रपट ‘अरविंदा समेथा’ चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यात तीन जूनियर एनटीआरसोबत दिसली होती.

Leave a Comment