चीनमध्ये रिलीज होणार भाऊ कदमचा ‘हाफ तिकीट’ चित्रपट


मराठी सिनेसृष्टीमध्ये गेल्या काही वर्षात सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात आहेत. मागील वर्षी अशाच एका नवीन संकल्पनेतुन तयार झालेला हाफ टिकीट हा चित्रपट रिलीज झाला होता. उत्कृष्ट पटकथा व उत्तम अभिनयाच्या जोरावर समित कक्कड दिग्दर्शित या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. आता हाफ तिकीटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे. लवकरच चीनमध्येही हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. आजवर चीनमध्ये फक्त बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट रिलीज प्रदर्शित केले जात होते. पण आता हाफ तिकीटच्या माध्यमातून चीनमध्ये मराठी चित्रपटही धुमाकूळ घालण्यास सज्ज आहेत असे म्हटले जात आहे.

आगामी एक-दोन महिन्यात हाफ तिकीट चीनमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज असून चीनसारखी मोठी बाजारपेठ या चित्रपटाच्या निमित्ताने आता मराठी चित्रपटांसाठीसुद्धा खुली झाली असल्याचे मत चित्रपटाचे निर्माते नानूभाई जयसिंघानी यांनी व्यक्त केले. तसेच मराठी चित्रपट आज जगभरात पोहोचत असल्याचा आनंद दिग्दर्शक समित कक्कड यांनी व्यक्त केला.

Leave a Comment