अफगाणिस्तानातील या पठ्ठ्याने बनवली गवतापासून विश्वचषकाची प्रतिकृती


दुबई – येत्या ३० मेपासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरूवात होत असून अफगाणिस्तानचा संघ यावेळी पहिल्यांदा सहभागी होत आहे. मागील वर्षी भारताविरुद्ध खेळताना अफगाणिस्तानने कसोटीत पदार्पण केले आहे. यादरम्यान एका अफगाणिस्तानमधील एक क्रिकेट चाहत्याने चक्क गवतापासून विश्वचषकाची प्रतिकृती बनवली आहे. आयसीसीला त्याचा हा फोटो एवढा आवडला आहे, की तो त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर शेअर केला आहे.


अफगाणिस्तानमधील या पठ्ठ्याने गवतापासून बनवलेल्या ट्रॉफीचा फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या ट्रॉफीसोबत आयसीसीने त्या चाहत्याचाही फोटो शेअर केला आहे. आयसीसीने या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, आम्हाला या ट्रॉफीचा फोटो खूपच आवडला. ही ट्रॉफी ज्यांनी बनवली त्याला आम्हाला भेटायला आवडेल.

हा फोटो लोकांना खूपच आवडत आहे. त्या फोटोवर चांगल्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. काही लोक याला पर्यावरण जागरुकता तर काही जण याचा संबंध जागतिक तापमान वाढीशी जोडला जात आहेत. ही ट्रॉफी बनवणारा माणूस कोण आहे याची माहिती अजून मिळाली नाही.

Leave a Comment