मी कॅनडाचा नागरिक असल्याचे कधीच लपवले नाही


17व्या लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यामुळे बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारला ट्रोल केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही दिवसांपूर्वी अराजकीय मुलाखत त्याने घेतली होती. मोदी विरोधकांच्या निशाण्यावर त्यामुळे तो होता. त्यातच मतदान करत आपले फोटो असंख्य बॉलिवूडकरांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. मुंबईत त्याची पत्नी ट्विंकल खन्नानेदेखील मतदान केले होते. पण मतदानापासून अक्षय लांबच होता.

कॅनडाचे नागरिकत्व अक्षय कुमारने स्वीकारले असल्यामुळे भारतात त्याला मतदान करत आले नाही. त्याला यामुळेच ट्रोल करण्याचा प्रयत्न नेटीझन्सनी केला आहे. त्याला काही पत्रकारांनीदेखील हा प्रश्न विचारून उत्तर मिळवायचा प्रयत्न केला. पण यावर त्याने भाष्य केले नव्हते. त्याने आज आपली बाजू मांडणारे ट्विट करीत ट्रेलर्सना उत्तर दिले आहे.

ट्विटरवर अक्षय कुमारने लिहिले आहे, सोशल मीडियावर माझ्या नागरिकत्वाबद्दल विनाकारण उत्सुकता आणि नकारात्मकता का दाखवली जात आहे, पण खरच माझ्या हे लक्षात येत नाही. कॅनडाचा पासपोर्ट माझ्याकडे आहे, मी कधीच हे नाकारले अथवा लपवलेलेदेखील नाही. मी गेल्या ७ वर्षांत एकदाही कॅनडाला गेलो नाही. भारतात मी काम करतो आणि येथील सर्व प्रकारचे करही भरतो. मला या एवढ्या वर्षांमध्ये कधीही माझे भारताप्रती देशप्रेमसिद्ध करण्याची गरज भासली नाही. मला माझ्या नागरिकत्वाच्या मुद्यावरून विनाकारण वादात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा मुद्दा खासगी, कायदेशीर, अराजकीय आणि कोणाशीही संबंध नसलेला आहे. मी नेहमीच भारताला मजबूत बनवण्यासाठी माझ्यापरीने योगदान देत राहीन.

Leave a Comment