मागच्या वर्षी ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान एका मोठ्या हिट चित्रपटाच्या प्रतिक्षेत होता. तो लवकरच ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गंप’चा हा चित्रपट हिंदी रिमेक आहे.
या दिवशी रिलीज होणार आमिर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’
Mark the date… Aamir Khan's new film #LaalSinghChaddha to release on #Christmas 2020… Stars Aamir in title role… Directed by Advait Chandan… Written by Atul Kulkarni… #Viacom18Movies
— taran adarsh (@taran_adarsh) May 4, 2019
याबाबतची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाणार आहे. अद्वैत चव्हाण या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अद्वैत यांनी यापूर्वी ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अतुल कुलकर्णी यांची या चित्रपटाची कथा आहे.
‘लाल सिंग चढ्ढा’च्या पात्रासाठी आमिर खानने आपले वजनही घटवण्यास सुरूवात केली आहे. तो तब्बल २० किलो वजन या चित्रपटासाठी घटवणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ह्रतिक रोशनचा ‘क्रिश-४’ चित्रपटही ख्रिसमसच्या पर्वावर रिलीज होणार असल्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसेल, हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. तरी, लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.