बॉलीवूड मधील काही मनोरंजक गोष्टी


जगात चित्रपट जगतात बॉलीवूड दोन नंबरचा मोठा उद्योग आहेच पण भारतातील अनेक लोकांच्या आयुष्याचा तो एक भाग आहे. मनोरंजनाचे हे मोठे साधन आहे. भारतात १३ हजार चित्रपटगृहे आहेत आणि दरवर्षी सरासरी २ अब्ज ७० लाख तिकिटे खरेदी केली जातात असे आकडेवारी सांगते. तिकिटे खपण्याचे हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.


बॉलीवूडची अनेक गिनीज बुक रेकॉर्ड नोंदली गेली आहेत. अभिषेक आणि अमिताभ या प्रत्यक्षातला मुलगा आणि वडिलांनी पा या चित्रपट बरोबर उलट भूमिका साकारली होती आणि त्याची नोंद गिनीज मध्ये झाली आहे. सुनील दत्त यांनी यादे या चित्रपटात ११३ मिनिटांचा सर्वाधिक लांबीचा रोल केला होता तसेच जगदीश राज यांनी १४४ चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती, तसेच कहो ना प्यार है या चित्रपटाने ९२ बक्षिसे मिळवून विक्रम नोंदविला याचीही नोंद गिनीजने घेतली आहे. सुनील दत्त यांनी २० चित्रपटात दरोडेखोरची भूमिका साकारली आहे.


दिलवाले दुल्हनिया हा सर्वाधिक म्हणजे १ हजार आठवडे चाललेला चित्रपट ठरला आहे. स्वदेश हा शाहरुख खानचा चित्रपट खरया कहाणीवर आधारित असून अरविंद पिल्लमारी व त्यांच्या पत्नीने परदेशातील नोकरी सोडून गावात शाळा, वीज या सुविधा दिल्या होत्या. श्रीदेवीने वयाच्या १३ व्या वर्षी तमिळ चित्रपटात रजनीकांत याच्या सावत्र आईची भूमिका केली होती. विशेष म्हणजे रजनीकांत ज्यासाठी फेमस झाला तो इम्मा रास्कला हा शब्द त्याने कधीच म्हटला नव्हता.


वहिदा रेहमान हिने तसेच राखी गुलजार हिने बिग बीची नायिका आणि आई अश्या दोन्ही भूमिका केल्या आहेत. वहिदा अदालत मध्ये अमिताभची हिरोईन होती तर त्रिशूल मध्ये आई. त्रिशूल मध्ये राखी अमिताभची हिरोईन होती तर शक्ती मध्ये आई. मदर इंडिया मध्ये नर्गिसने सुनील दत्तच्या आईची भूमिका केली आणि नंतर त्या दोघांनी लग्न केले होते. गुजराथ मध्ये ५ लाख शेतकऱ्यांनी मंथन चित्रपट निर्मिती केली तो दुग्ध क्रांतीवरचा चित्रपट होता.


सिलसिला हा एकमेव असा चित्रपट होता ज्यात शशीकपूर अमिताभचा मोठा भाऊ बनला होता. आमीर खानचा लगान हा सर्वाधिक परदेशी कलाकारांनी काम केलेला चित्रपट होता. दो आंखे बारा हात हा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळविलेला पहिला भारतीय चित्रपट. ए मलिक तेरे बंदे हम हे या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे पाकिस्तानात शाळेत प्रार्थना म्हणून म्हटले जात असे. गायक मोहम्मद रफी यांना बॉक्सिंगचे सामने पाहणे खूपच आवडत असे. हिरोईन या चित्रपटात करीना कपूरने १३० ड्रेस वापरले होते आणि हा कपड्यांवर सर्वाधिक खर्च झालेला चित्रपट ठरला होता.

Leave a Comment