बराक आणि मिशेल ओबामा फिल्म निर्मिती क्षेत्रात


अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी फिल्म निर्मित क्षेत्रात पाउल टाकले असून त्यासाठी नेटफ्लिक्स बरोबर करार करण्यात आला आहे. केवळ मनोरंजन नाही तर लोकांमध्ये जागृती करू शकतील, त्यांना प्रेरणादायी ठरतील अश्या विषयांवर चित्रपट आणि सिरीज निर्मिती करण्यावर ओबामा यांचा भर राहील असे त्यांनी जाहीर केले आहे.

गेल्यावर्षी बराक आणि मिशेल यांनी हायर ग्राउंड नावाची प्रोडक्शन कंपनी सुरु केली आहे आणि त्याअंतर्गत सात प्रोजेक्ट हाती घेतले गेल्याची घोषणा केली आहे. या संदर्भात मिशेल म्हणाल्या त्यांना हे काम आवडते कारण त्यातून खूप नवीन माहिती मिळते, खूप काही शिकायला मिळते. आम्ही अश्याच कथा निवडणार आहोत ज्या रोजच्या आयुष्यात सर्वत्र दिसतात. या फिल्ममधून प्रत्येकासाठी काही ना काही देण्याचा आमचा प्रयत्न राहील. म्हणजे उत्सुक बालके आणि त्यांचे मॅच्युअर्ड आईवडील, घरातील वृद्ध व्यक्ती, समाजातील शोषित घटक, गरीब, श्रीमंत सर्वांसाठी काही ना काही प्रेरणा यातून मिळेल. तसेच समाजातील प्रत्येक स्तर, प्रत्येक पैलू, नागरी हक्क, लोकशाही यांची ओळख करून देणाऱ्या प्रेरणादायी कथा या माध्यमातून दाखविल्या जातील.

नेटफ्लिक्स आणि हायर ग्राउंडने क्रिप कॅम्पचे अधिकार नुकतेच खरेदी केले असून ही एक डॉक्युमेंटरी आहे. त्यात अपंग मुलांवर आधारित समर कॅम्पची कहाणी आहे. हे मुले १९७० मध्ये न्यूयॉर्क मध्ये सापडली होती.

Leave a Comment