झाकीर नाईककडे १९३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता – ईडी


मुंबई- अंमलबजावणी संचालयानांकडून (ईडी) पीएमएलए कोर्टात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत मुस्लिम तरुणांची माथी भडकवल्याचा आरोप असलेला व सध्या देशातून फरार होऊन मलेशियात लपलेल्या विवादित इस्लामिक धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यात तब्बल १९३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अगोदर विशेष न्यायालयाने मुंबईतील झाकीर नाईक याच्या मालकीच्या ५ मालमत्तांवर जप्ती आणण्याचे आदेश दिले होते. ज्यात मुंबईतील माझगाव परिसरातील क्रिस्टल रेसिडेन्सी इमारतीतील ३६० चौ. फुटांचा व्यावसायिक गाळा, जास्मिन इमारतीतील बी-१००५ आणि बी-१००६ हे दोन फ्लॅट, मारिया हाईट्स इमारतीतील १७०१ आणि १७०२ हे दोन फ्लॅट या संपत्तीचा समावेश आहे.

दरम्यान बांगलादेश, भारतात झाकीर नाईक याच्या पीस टिव्हीवर प्रसारणावर बंदी असून या वाहिनीच्या प्रसारणास श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब ब्लास्ट नंतर तेथेही बंदी घालण्यात आली आहे. झाकीर नाईक याच्या आयआरएफ म्हणजेच इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेवर सुद्धा २०१६ साली केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Comment