दुसऱ्या पोस्टरसह समोर आली ‘दे दे प्यार दे’ची रिलीज डेट


लवकरच सिनेमागृह गाजवण्यासाठी अजय देवगण, तब्बू आणि रकुल प्रीत अशी तगडी स्टारकास्ट सज्ज झाली असून ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातून हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटात अजय आशिष नावाच्या ५० वर्षांच्या व्यक्तीचे पात्र साकारत आहे. तर रकुल आयशा नावाच्या २६ वर्षाच्या तरूणीचे पात्र साकारत आहे. जी आशिषची गर्लफ्रेंड आहे. तर तब्बू अजयच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

अजय, तब्बू आणि रकुल या पोस्टरमध्ये एका बाईकवर बसलेले दिसत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शेअर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अकिव अली यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, किशन कुमार आणि लव रंजन यांनी केली आहे. मे महिन्यात १७ तारखेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment