‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ला कमी लेखून फसल्या शोभा डे


सध्या जगभरात मार्व्हलचा सर्वात मोठा चित्रपट अव्हेंजर्स एंडगेम धुमाकूळ घालत असून या चित्रपटाने भारतात पहिल्या पाच दिवसांत तब्बल २०० कोटी रुपयांची कमाई करण्याचा विक्रम रचला. मिळेल त्या मार्गाने मिळेल त्या किंमतीला तिकीट विकत घेऊन सुपरहिरो चाहते हा चित्रपट पाहात आहे. या चित्रपटाचे चाहत्यांमध्ये असलेले वेड यावरुनच आपल्या लक्षात येते. पण संपूर्ण जगाला वेड लावणारा अव्हेंजर्स एंडगेम हा एक बावळट चित्रपट आहे असे भारतीय स्तंभलेखक शोभा डे यांना वाटते.

आपल्या खळबळजनक स्तंभलेखनामुळे लेखिका शोभा डे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी यावेळी मार्व्हलच्या सर्वात मोठ्या चित्रपटावर निशाणा साधला आहे. अव्हेंजर्स एंडगेम म्हणजे कोट्यवधी डॉलर्स खर्चून प्रेक्षकांसाठी केलेला हा निव्वळ विनोद आहे. तसेच हा आतापर्यंतचा सर्वांत कंटाळवाणा चित्रपट असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. अनेक सुपरहिरो चाहते त्यांचे ट्विट वाचून त्यांच्यावर संतापले आहेत. त्यांनी शोभा डे यांच्या ट्विटला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.

अव्हेंजर्स एंडगेमचा पहिला भाग अव्हेंजर्स इन्फिनीटी वॉर गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यावेळी या चित्रपटाबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनाही मार्व्हल चाहत्यांनी त्यावेळी ट्रोल केले होते.

Leave a Comment