राज ठाकरेंकडे निवडणूक आयोगाने मागितला सभांच्या खर्चाचा तपशील


मुंबई – राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या रॅली आणि जाहीर सभेचा तपशील द्यावा, असे सांगितले आहे.

एकही उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा नसताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात राज्यात जोरदार प्रचार केला आहे. राज ठाकरे यांनी या सभांना खूप गर्दीही खेचली. आता राज ठाकरे यांना त्यांच्या प्रचार सभांचा खर्च निवडणुक आयोगाला सादर करावा लागणार आहे.

त्यांना या सभांच्या खर्चाचा तपशील राज ठाकरे यांचा पक्ष नोंदणीकृत असल्याने द्यावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने त्यांना त्याबाबतची नोटीस दिली आहे. त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ९० दिवसांच्या आत निवडणुकीच्या रॅलीतील खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसेचा एकही उमेदवार नसल्याने त्यांच्या सभांचा खर्च नेमक्या कुणाच्या नावावर दाखवायचा, याबाबत निवडणूक आयोगच संभ्रमात असल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. तर, भाजपने हा खर्च मनसेच्या खात्यात दाखवण्यात यावा, अशी मागणी केली होती.

Leave a Comment