घुंगटबंदी संदर्भातील माझ्या वक्तव्याचा केला गेला विपर्यास : जावेद अख्तर


मुंबई – प्रसिद्ध गीतकार आणि पुरोगामी विचारवंत जावेद अख्तर यांनी बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, ते महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे. आपला बुरख्यावर बंदी घालण्याला कोणताही आक्षेप नसून, राजस्थानात होत असलेल्या ६ मेच्या मतदानापूर्वी केंद्र सरकारने घुंगट प्रथेवरही बंदी घालावी, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. पण अख्तर यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे स्पष्टीकरण देत दोन्हींवर बंदी घालण्याचे मत नोंदवले आहे.

माझे बुरख्याबाबत ज्ञान खूपच कमी असून कारण मी ज्या घरात राहिलो त्या घरातील सर्व महिला या कामावर जाणाऱ्या होत्या. कधीही मी माझ्या घरात बुरखा पाहिला नसल्याचे अख्तर म्हणाले. इराक हा मोठा कट्टर देश आहे. पण तेथील महिला आपला चेहरा झाकत नाहीत. जो कायदा श्रीलंकेत आला आहे, त्यानुसार तुमचा चेहरा तुम्ही झाकू शकत नाही. बुरखा वापरा, पण चेहरा झाकलेला असता कामा नये. त्यांनी हे कायद्यात अंतर्भूत केले असल्याचेही अख्तर पुढे म्हणाले.

तुम्हाला भारतात जर कायदा (बुरखा परिधान करण्यावर प्रतिबंधासाठी) हवा असेल आणि त्याबाबत कुणाचे तसे मत असेल तर त्याबाबत मला काहीही आक्षेप नाही. पण राजस्थानातील मतदानापूर्वी तेथे कुणीही घुंगट घालणार नाही अशी घोषणा केंद्र सरकारने करावी. मला तर असे वाटते की बुरखाबंदीही व्हावी आणि घुंगटबंदीही व्हावी, असे जावेद अख्तर यांनी म्हटले होते. पण चुकीच्या पद्धतीने आपला मुद्दा मांडल्याचे सांगत अख्तर यांनी आपले म्हणणे ट्विटद्वारे स्पष्ट केले.

Leave a Comment