थायलंडच्या 66 वर्षीय राजाने महिला अंगरक्षकाशी चौथे लग्न


अवघ्या काही दिवसांवर राज्याभिषेक असताना आपल्या सुरक्षापथकाचे कमांडर सुथिदा तिजाई यांच्याशी थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न यांनी लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी लग्नानंतर सुथिदा यांना राणीचा दर्जा दिला आहे. थायलंडच्या राजाचा येत्या काही दिवसांतच अधिकृतरित्या राज्याभिषेक होणार आहे.

हे वजीरालोंगकोर्न यांचे चौथे लग्न असून ते 66 वर्षांचे आहेत. तीन राण्यांपासून त्यांना पाच मुले आणि दोन मुली आहेत. या शाही लग्नाची घोषणा ‘रॉयल गॅझेट’ या वृत्तपत्रातून करण्यात आली. थाय वृत्तवाहिन्यांवर बुधवारी पार पडलेल्या या लग्नाच्या विधी प्रसारित करण्यात आल्या.

राजा राम दहावे म्हणूनही वजीरालोंगकोर्न यांना ओळखले जाते. 13 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांचे वडील राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचे निधन झाल्यानंतर वजीरालोंगकोर्न यांना राजा घोषित करण्यात आले. राजा अदुल्यादेज यांच्या निधनावर एक वर्षाचा शोक घोषित करण्यात आला होता. त्यामुळे राजा वजीरालोंगकोर्न यांचा राज्याभिषेक करता आला नव्हता.

वजीरालोंगकोर्न यांनी 2014मध्ये सुथिदा तिजाई यांची पर्सनल बॉडीगार्ड युनिटमध्ये डेप्युटी कमांडर म्हणूण नियुक्ती केली होती. सुथिदा त्याआधी थायलंड एअरवेजमध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणूण काम करत होत्या. वजीरालोंगकोर्न हे राजा झाल्यावर त्यांनी सुथिदा यांना 2016मध्ये सेनेत जनरल हे पद दिले होते. 2017मध्ये राजासोबत त्या पर्सनल बॉडीगार्ड म्हणूण राहू लागल्या होत्या.

Leave a Comment