अखेरीस या दिवशी रिलीज होणार पीएम मोदी बायोपिक


अभिनेता विवेक ओबेरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे, पण गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गात अडथळे येत आहेत.

हा चित्रपट निवडणूकांच्या काळात प्रदर्शित झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल असे सांगत निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. या चित्रपटाची आता नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट आता निवडणुकांच्या निकालानंतर म्हणजेच मे महिन्यात २४ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

याबद्दलची माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली असल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटले आहे. हा चित्रपट सुरुवातीला ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण, काही कारणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन ११ एप्रिलला होणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर चित्रपट आता मे महिन्यात २४ तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मोदींच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.

Leave a Comment