पत्नीला पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून मागितला घटस्फोट


अबुधाबी : ऑनलाईन खेळला जाणारा प्लेयर्स अननोन बॅटलग्राउंड म्हणजेच पबजी (PUBG) गेम प्रसिद्ध आहे. हा गेम लाँच झाल्यापासून जगभरात त्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. अनेक लोक हा गेम खेळण्यासाठी एवढे वेडे होतात की त्यांना वेळ आणि ठिकाणाचेही भाण राहात नाही. असाच एक वेगळा प्रकार या गेमला घेऊन समोर आला आहे.

पबजी खेळण्यापासून संयुक्त अरब अमिरात येथे पतीने रोखल्याने संतापलेल्या पत्नीने थेट घटस्फोटाची मागणी केली आहे. पबजी पतीने गेम खेळू न दिल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर पत्नीला पतीने मारहाणही केली. अखेर संतापलेल्या पत्नीने थेट अजमान पोलीस ठाणे गाठले. पोलीस स्टेशनचे कॅप्टन वफा खलील अल होसानी यांनी सांगितले, अजमान पोलीस स्टेशनच्या सामाजिक केंद्रात संबंधित महिला मदतीसाठी आली आणि तिने घटस्फोटाची मागणी करत कारण सांगितले. माझा मनोरंजनाच्या साधनांच्या निवडीचा अधिकार नाकारला जात आहे. मला आनंद देणाऱ्या आणि खेळता येणाऱ्या खेळापासून दूर ठेवले जात असल्याचे म्हणत या महिलेने घटस्फोटाची मागणी केली.

Leave a Comment