आता गाल आणि कानाच्या स्पर्शाने अनलॉक होणार आयफोन


नवनवीन तंत्रद्यानाचा वापर करण्यात आघाडीवर असलेल्या अॅपल ने फोन अनलॉक करण्याच्या नव्या पद्धतीचे पेटंट घेतले असून या फिचरमुळे फिंगरप्रिंट सारखेच स्क्रीनला गाल किंवा कानाचा स्पर्श करून आयफोन अनलॉक करता येणार आहे. अॅपलच्या सप्टेंबरमध्ये लाँच होणाऱ्या आयफोनमध्ये हे फिचर मिळू शकेल असे सांगितले जात आहे. या पेटंट साठी कंपनीने २०१६ मध्येच अर्ज दाखल केला होता मात्र पेटंट मिळाल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. हे पेटंट मेथड्स ऑफ बायोमेट्रिक इमेजिंग ऑफ इनपुट सरफेस नावाने दाखल केले गेले होते. पेटंट मध्ये असाही उल्लेख होता की अॅपल सेन्सरचा वापर युजर गाल, कान फोन अनलॉक करण्यासाठी करू शकेल.

नवीन सिस्टीममध्ये फेसिंग डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट रीडर स्क्रीनवर बोट ठेऊन युजर फोन अनलॉक करू शकेल तसेच पेमेंट करण्यासाठी फक्त स्क्रीनवर टच करून पासवर्ड टाकावा लागेल. नवी टच आयडी सिस्टीम अॅपलने प्रथम आयफोन ५ एस मध्ये जारी केलेल्या पारंपारिक सिस्टीमपेक्षा वेगळी आहे. टच आयडी होमबटण खाली दिलेल्या फिंगरप्रिंट रीडरवर बोट ठेवल्यावर काम करते. आता नवीन मॉडेल मध्ये एज टू एज डिस्प्ले स्क्रीनवर बिल्ट इन फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. नवीन तंत्राने स्क्रीनवर कुठेही टच केला तरी चालणार आहे.

अन्य फिंगरप्रिंट सेन्सरपेक्षा नवा सेन्सर अधिक सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे तंत्रज्ञान सॅमसंग आणि हुवावे मॅट २०प्रो मध्येही वापरले गेले आहे.

Leave a Comment