हुवावे लाँच करणार जगातील पहिला ५ जी टीव्ही


इलेक्ट्रोनिक आणि टेलीकम्युनीकेशन ब्रांड हुवावे टेक्नोलॉजी या वर्षी जगातला पहिला ५ जी कनेक्टीव्हिटी असलेला टीव्ही लाँच करण्याच्या तयारीत असून या प्रीमियम स्मार्त टीव्हीला ५ जी कनेक्शन सह ८ के रेझोल्युशन दिले जाणार आहे. या वर्षाच्या अखेरी तो बाजारात दाखल होत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

५ जी मोड्यूल कॅरी करणारा हा पहिलाच टीव्ही असून यामुळे न्यू जनरेशन नेटवर्क मधून हेवी डेटा म्हणजे ३६० डिग्री व्हिडीओ, व्हर्च्युअल रीअॅलिटी प्रोग्राम डाऊनलोड करता येणार आहेत. ३६० दिगी व्हिडीओ युजर कोणत्याही बाजूने पाहू शकतात. हुवावेने यापूर्वीच सॅमसंग, अॅपलला मार्केट मध्ये आव्हान उभे केले आहे. हुवावे जगातील सर्वात मोठी इक्विपमेंट मेकर कंपनी म्हणून प्रसिद्धीस आली आहे. कंपनीचा नवा टीव्ही सध्याचा बाजारात उपलब्ध असलेल्या स्टँडर्ड फुल एचडी टीव्ही पेक्षा १६ पट अधिक चांगले पिक्सल देईल शिवाय याला स्मार्टटीव्ही प्रमाणे फायबर ऑप्टीक, डीटीएच केबल बॉक्सची गरज राहणार नाही कारण हा टीव्हीच राऊटर हब सारखे काम करणार आहे.

बिझिनेस मार्केटच्या आकडेवारीनुसार २०१९ च्या पहिल्या तिमाहीत हुवावेने अॅपलला मागे टाकून जगातील २ नंबरची स्मार्टफोन कंपनी बनण्याची कामगिरी बजावली आहे. हॉंगकाँग फर्म कौंटर पॉइंट रिसर्च डेटा नुसार हुवावेने २०१८ च्या पहिल्या तिमाहीत ३.९३ कोटी स्मार्टफोन विकले होते तर २०१९ च्या याच तिमाहीत ५.९१ कोटी स्मार्टफोन विकले आहेत. अॅपलने २०१८ च्या पहिल्या तिमाहीत ५.२२ कोटी स्मार्टफोन विकले होते तर २०१९ च्या याच तिमाहीत ४.२ कोटी स्मार्टफोन विकले आहेत. सध्या सॅमसंग सर्वात मोठा टीव्ही मेकर ब्रांड असून त्यांच्या ८ के रेझोल्यूशन टीवीची किंमत ४९९९ डॉलर्स म्हणजे साधारण साडेचार लाख रुपये असून तो लवकरच बाजारात येणार आहे.

Leave a Comment