रोनाल्डोने खरेदी केली ८६ कोटींची बुगाटी


जगातील सर्वात महागडी बुगाटी ला वोईतूर नोईरे कार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने खरेदी केली असल्याची चर्चा सुरु असून या कारची किंमत १.१ कोटी युरो म्हणजे ८६ कोटी रुपये आहे. ही कार रोनाल्डोला २०२१ मध्ये मिळणार आहे. बुगाटीने कार खरेदी केलेल्या ग्राहकाचे नाव जाहीर केलेले नाही मात्र स्पॅनिश स्पोर्ट्स डेली मार्को मध्ये आलेल्या बातमीनुसार ही कार सध्या इटालियन लीग सिरी ए युवेन्टस साठी खेळत असलेल्या पोर्तुगाली फुटबॉलरने खरेदी केल्याचे म्हटले आहे. यापूर्वी ही कर वोल्क्सवॅगन चे माजी अध्यक्ष फेरीना पिएच यांनी खरेदी केल्याची बातमी आली होती.


डेली मेलच्या रिपोर्टनुसार ही कर प्रथम या वर्षी जेनेव्हा ऑटोशो मध्ये प्रदर्शित केली गेली होती. रोनाल्डो ने ती ८६ कोटी रुपयांना खरेदी केली असली तरी या कारच्या प्रोटोटाईपमध्ये काही भागांना अंतिम रूप देण्याचे काम सुरु असल्याने रोनाल्डोला ती २०२१ साली मिळू शकेल. या कारचे डिझाईन १९३६ व १९३८ मध्ये बनलेल्या टाईप ५७ एसी अटलांटिक मॉडेल प्रमाणे असून तिला ८.० लिटरचे टर्बोचार्ज्ड डब्लू -१६ इंजिन दिले गेले आहे. या कारचा सर्वाधिक वेग ४१६ किमी इतका आहे.

टीम इंडिया चा माजी कप्तान धोनी जसा बाईकवेडा आहे तसाच रोनाल्डो कारवेडा आहे. गेल्या वर्षी त्याने २१.५ लाख पौंड खर्च करून बुगाटी चीरॉन खरेदी केली आहे. या शिवाय त्याच्याकडे मर्सिडीज सी क्लास स्पोर्ट्स कुपे, अॅस्टन मार्टिन, लोम्बार्गिनी अवेन्टेडोर एलपी ७००-४, उन फरारी ५९९ जीटीओ, मॅक्ल्ररेन, बेन्टले काँटीनेंटल जीएसटी स्पीड, रोल्स रॉयास फॅटम सह अनेक कार्स आहेत.

Leave a Comment