क्रिकेटच्या देवाचा शाहिद आफ्रिदीने केला अपमान!


आतापर्यंतच्या सर्व क्रिकेटपटूंमधून वर्ल्ड कपचा संघ पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने निवडला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांना या संघात वगळले आहे. 5 पाकिस्तानचे खेळाडू असून ऑस्ट्रेलियाचे 4 जण शाहिद आफ्रिदीने निवडलेल्या 11 जणांच्या संघात आहेत. तर दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या केवळ एका खेळाडूचा समावेश आहे.

6 वर्ल्ड कपमध्ये खेळताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 2 हजार 278 धावा केल्या आहेत. तरीही सर्वकालिन संघात सचिनचा समावेश न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आफ्रिदीने संघात बेस्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीलाही घेतले नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला आहे. त्याशिवाय 2015 पर्यंत भारत सेमीफायनलला पोहचला होता. धोनी आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीचा आफ्रिदीने आपल्या संघात समावेश केला आहे. कोहली 2011 आणि 2015 च्या वर्ल्ड कप संघात होता. 2019 चा वर्ल्ड कप भारत कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. शाहिद आफ्रिदीने निवडलेल्या संघात सईद अन्वर, अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, विराट कोहली, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, वसिम आक्रम, ग्लेन मॅक्ग्रा, शेन वॉर्न, शोएब अख्तर, सकलेन मुश्ताक़ यांचा समावेश आहे.

Leave a Comment