राहुल गांधींनी ‘त्या’ वक्तव्याचे ४८ तासांत स्पष्टीकरण द्यावे – निवडणूक आयोग


नवी दिल्ली – २३ एप्रिलला मध्य प्रदेशात शहडोल येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या एका भाषणाबद्दल त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली. आदीवासींना गोळ्या घालण्याचा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनवला असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. या वक्तव्याचे ४८ तासांत स्पष्टीकरण देण्यास आयोगाने त्यांना सांगितले आहे.

राहुल गांधी यांनी शहडोलमधील सभेत बोलताना आदिवासींसाठी मोदी सरकारने नवा कायदा बनवला आहे. त्याअंतर्गत आदिवासींना गोळ्या घातल्या जातील, असे म्हटले होते. तुमची जमीन, जंगल, जल ते हिरावून घेऊ शकतील. तुमची एन्काऊंटर केली जातील. गोळ्या घातल्या जातील, अशी वक्तव्य केली होती. त्यांना त्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. ४८ तासांत राहुल गांधी यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यास त्यांच्यावर कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय आचारसंहिता भंगाची कारवाई केली जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.

Leave a Comment