चालू वर्षातच लाँच होणार ‘फेसबुक मॅसेंजर’चे डेस्कटॉप व्हर्जन


लवकरच फेसबुक मॅसेंजरचे डेस्कटॉप वर्जन लाँच करण्यासह अनेक नवी फिचर्स त्यात अॅड होणार असल्याची घोषणा फेसबुकने केली. फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी ही घोषणा नुकत्यात पार पडलेल्या वार्षिक विकसक परिषदेमध्ये केली.

Windows आणि macOS या दोन्ही प्रणालीसाठी फेसबुकचे मॅसेंजर अॅप तयार करण्यात येणार आहे. यात युजर्सना ग्रुप मॅसेजिंग, व्हिडिओ चॅटिंग, GIF इमेजेस पाठविण्याची सुविधा मिळेल. हे अॅप सध्या टेस्टिंग मोड मध्ये असून, ते चालू वर्षातच लाँच करण्यात येणार असल्याचे फेसबुकने म्हटलं आहे.

तसेच यात group viewing नावाचं आणखी एक फिचर अॅड होणार आहे. मित्रांसोबत व्हिडिओ बघण्यासाठी ज्याचा उपयोग तुम्ही करू शकाल. त्याचबरोबर तो व्हिडिओ सुरू असताना तुम्ही संभाषण देखील करू शकाल. या फिचरला कोणता व्हिडिओ प्लॅटफॉर्म सपोर्ट करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तुमच्यात चॅटिंग करताना आणखी उत्साह निर्माण करण्यासाठी फेसबुक मॅसेंजरमध्ये एक डेडीकेटेड स्पेस देण्यावर फेसबुक विचार करत आहे. तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना ज्यात आवडीनुसार कंटेट मिळवता येईल. त्याचबरोबर तुम्ही काही लोकांनाच दिसू शकेल असा मॅसेज किंवा स्टोरी तयार करू शकाल.

फेसबुक याशिवाय बिजनेससाठी मॅसेंजरचा उपयोग आणखी रंजक बनवण्यावर फेसबुक भर देत आहे. लवकरच नव्या स्वरूपात फेसबुक मॅसेंजरमध्ये जाहिराती झळकतील ज्याचा उपयोग व्यावसायिकांना उत्तम प्रकारे करून घेता येईल. तसेच अपॉइंटमेंट हे नवे फिचरसुद्धा यात अॅड होणार आहे. ज्यात कोणत्याही हॉटेल मालकाशी बोलून तुम्ही बुकिंग करू शकाल.

Leave a Comment