देशातील वातावरण बिघडवण्याचे काम ‘चौकीदार’ करत आहे – जया बच्चन


लखनौ – समाजवादी पार्टीच्या नेत्या आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता देशामधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न चौकीदार करत असल्याचा आरोप केला आहे. जया बच्चन लखनौ येथे समाजवादी पार्टीचे उमेदवार पूनम सिंन्हा यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. त्यांनी या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

चौकीदाराची देशामध्ये महत्वाची भूमिका असते. पण सद्या जो चौकीदार आहे. देशामधील वातावरण तो बिघडवत असल्याचे जया बच्चन म्हणाल्या. पूनम सिन्हा यांना तुम्ही सगळे जण विजयी करण्याचे मला वचन द्या, अन्यथा मला त्या मुंबईमध्ये जाण्यास मज्जाव करतील. पूनम माझ्या चांगली मैत्रीण असून माझे त्याच्याशी मागील ४० वर्षापासून चांगले संबंध आहेत. असेही जया म्हणाल्या.

नविन उमेदवारांचे समाजवादी पार्टी नेहमी स्वागत करते. त्यामुळे नविन उमेदवारांच्या पाठीशी आपण सगळे जण उभे राहून त्यांना विजयी केले पाहिजे. मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्यांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जो उत्साह आता मला दिसत आहे. तसाच उत्साह मतदानाच्या दिवशी दाखवा, असेही जया बच्चन म्हणाल्या.

Leave a Comment