म्हणून आपला भारत महान


भारत माझा देश आहे अशी एक प्रतिज्ञा आपण शाळेपासून शिकतो. भारतात अनेक संस्कृती, अनेक धर्म, अनेक भाषा वापरल्या जातात त्यामुळेही भारताचे परकीयांना आकर्षण वाटते. पण अश्या अनेक गोष्टी खुद्द भारतीयांना माहिती नसतात ज्यामुळे भारत महान देश ठरतो. म्हटले तर अगदी साध्या वाटणाऱ्या या गोष्टी देशासाठी खूपच महत्वाच्या ठरतात कारण त्यामुळे देशाची प्रतिमा उज्ज्वल होते.


आपले पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद त्यांच्या पगारातील निम्मा म्हणजे ५० टक्केच पगार घेत असत. आजपर्यंत जगातील कोणत्याच देशाच्या राष्ट्रपतीने हे औदार्य दाखविलेले नाही. भारताने बनविलेले पहिले रॉकेट इतके हलके होते कि ते सायकलवरून वाहून नेता येत असे. तसेच चंद्रावर पाणी असल्याचा शोध सर्वप्रथम भारतीय अंतराळ संस्था इस्रोने लावला होता. शकुंतला देवी या भारतीय महिला पहिल्या मानवी कॅलक्यूलेटर म्हणून जगात प्रसिद्ध होत्या. हिऱ्याची पहिली खान भारतात सुरु झाली होती तसेच पहिले विश्वविद्यापीठ भारतात तक्षशीला येथे होते.


इंग्रजी बोलणाऱ्या जनतेत भारतीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. युएसए नंतर इंग्रजी बोलणारे लोक भारतात अधिक संख्येने आहेत. तसेच सर्वाधिक शाकाहारी लोक भारतात आहेत. भारत जगात सर्वाधिक दुध उत्पादन करणारा देश आहे आणि चीन व अमेरिकेच्या पाठोपाठ भारताचे लष्कर आकाराने मोठे आहे. ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक संखेने भारतात दरवषी नवीन बाळे जन्माला येतात आणि सर्वाधिक चित्रपट भारतात निर्माण होतात. इतकेच नाही तर सर्वाधिक खून भारतातच केले जातात.


शून्य ही भारताची जगाला दिलेली देणगी आहे तर बीजगणित आणि त्रिकोणमिती भारतातच सर्वप्रथम वापरली गेली. २६ मे रोजी स्वित्झर्लंड मध्ये सायन्स डे साजरा केला जातो तो भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान संशोधक एपीजे अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ साजरा होतो. भारतात दर १२ वर्षांनी महाकुंभ मेळा होतो आणि तो अंतराळातून दिसतो. भारतात जगात सर्वाधिक म्हणजे ३ लाख मशिदी आहेत. बुद्धिबळाचा शोध भारतात लागला तसेच शर्टच्या बटनांचा शोध भारतीयांची देणगी आहे.


भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारत जगातील सातवा मोठा देश आहे आणि तीन नंबरची अर्थव्यवस्था आहे. जगातील सर्वात लांब रस्ता भारतात आहे तसेच सर्वाधिक संख्येने पोस्टऑफिस भारतात आहेत. विशेष म्हणजे शाम्पूचा वापर भारतीयानी सर्वप्रथम केला असून तो जडीबुटी पासून बनविला गेला होता. शाम्पू हा शब्द संस्कृत शब्द चम्पू म्हणजे मसाज यावरून आला असे सांगितले जाते. आत्तापर्यंत जेवढे म्हणून कब्बडी वर्ल्ड कप झाले ते सर्व भारतीय कब्बडी संघाने जिंकलेले आहेत.

Leave a Comment