दुबईच्या वाळवंटात साकारतेय जगातील सर्वात मोठे सौर उर्जा पार्क


दुबईच्या वाळवंटात युएइ पंतप्रधान मोहम्मद बिन रशीद अल माक्तून याच्या नावाने साकारले जात असलेले सौर उर्जा पार्क जगातील सर्वात मोठे पार्क बनणार असून सध्याच ते रोज नवे विक्रम नोंदवीत आहे. हे पार्क उभारणीसाठी ९५,२०० कोटी खर्च होणार आहे आणि हे पार्क पूर्णत्वाने कार्यान्वित झाले कि त्यातून १३ लाख घरांना वीज पुरविली जाणार आहे. या पार्क मधून ५ हजार मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. या सौर उर्जा पार्कच्या तीन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून चौथ्या टप्प्याचे काम सुरु आहे. हे पार्क २०३० सालापर्यंत पूर्ण केले जाणार आहे.


हे पार्क म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याच्या दिशेने टाकले गेलेले महत्वाचे पाउल असून त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वर्षाला ६५ लाख टनांनी कमी होणार आहे. सध्याचे सर्वात मोठे सौर उर्जा पार्क चीन मध्ये असून त्यातून १५४७ मेगावॉट वीजनिर्मिती होते आहे. दुबई एनर्जी अँड वॉटर अॅथोरीटीकडून मिळालेल्या माहितीनुसार या पार्क उभारणीची घोषणा २०१२ साली केली गेली आणि हे पार्क उभारण्यासाठी दुबईतील सर्वधिक उंचीच्या बुर्ज खलिफा इमारतीच्या बांधकामाला लागलेल्या वेळेच्या तिप्पट वेळ लागणार आहे.


या पार्कच्या पहिल्या व दुसऱ्या फेजचे काम पूर्ण झाले असून तिसरी फेज लवकरच कार्यान्वित होत आहे. पहिल्या दोन फेजमधून सध्या ८०० मेगावॉट वीज निर्माण होत असून चार फेज पूर्ण झाले कि त्याचे प्रमाण १९६३ मेगावॉटवर जाणार आहे. पहिल्या व दुसरया टप्प्यासाठी २३ लाख सेलचा वापर केला गेला आहे. चार टप्पे पूर्ण झाले कि हा जगातील सर्वाधिक लांबीचा सोलर प्रकल्प होणार आहे. यामध्ये सौर उर्जा बॅटरी ऐवजी उष्णतेच्या रुपात साठविली जाणार आहे यामुळे त्यासाठी येणारा खर्च इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोर करण्यापेक्षा १० पटीने कमी होणार आहे. यात सूर्यप्रकाश नसला तरी प्लांट मध्ये वीज निर्मिती होत राहते.

लदाख भागात सुधा ३ हजार मेगावॉट क्षमतेच सौर उर्जा प्रकल्प उभारला जात असून तो २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. वाळवंटात सौर उर्जा प्रकल्प उभारताना येणारी समस्या म्हणजे मोड्यूलवर वाळू जमते व त्यामुळे वीज निर्मिती खामातेवर परिणाम होतो. दुबई मध्ये त्यासाठी ड्राय रोबोटिक क्लिनिंग सिस्टीम उभारली गेली आहे. यामुळे मोड्यूल्स लगेच स्वच्छ केली जातात असे समजते.
————

Leave a Comment