चीनी मॅरेथॉन पटूंची बेईमानी वाढली


चीनमध्ये अल्पावधीत मॅरेथॉन संस्कृती वाढली आहे पण त्याचप्रमाणात चीनी मॅरेथॉन पटूंची बेईमानी त्याच वेगाने वाढत चालल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची प्रतिमा डागाळली गेली आहे. याच महिन्यात बोस्टन येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत चीन चीनी अॅथलिटवर बंदी घातली गेली आहे. या स्पर्धेत चीनी धावपटूनी अनेक चुकीचे मार्ग चोखाळले असल्याचे दिसून आले. बंदी घालण्यात आलेल्या तीन स्पर्धकांपैकी दोघांनी नकली सर्टिफिकेट सादर केले होते तर अन्य एकाने त्याला मिळालेला बिब म्हणजे धावपटूंचा नंबर दुसऱ्या रनरला दिल्याचे दिसून आले होते. यामागे रेस पुरी केल्याचे प्रमाणपत्र मिळविणे इतकाच हेतू होता.


यंदाच्या मार्च मध्ये झालेल्या मॅरेथॉन मध्ये एका महिला धावपटूने मध्येच बाईक वापरली होती तर गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सुमारे २५० रनर्सनी शॉर्टकट मारून रेस पुरी केल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसले होते. बीजिंग सरकार लोकांना अॅक्टीव्ह लाइफस्टाइल मिळावी म्हणून दरवर्षी मॅरेथॉनचे आयोजन करते. त्यासाठी २०११ मध्ये २२ हाफ मॅरेथॉन स्पर्धा घेतल्या गेल्या होत्या आणि १५०० रनिंग इव्हेंट आयोजित केले गेले होते. मात्र सरकारी सक्ती असल्याने लोक आरोग्यापेक्षा दिखावा करण्यासाठी, सोशल मिडीयावर प्रोफाईल अधिक चांगले वाटावे म्हणून किंवा रेझ्युमे मध्ये स्वतःला फिट दाखविण्यासाठी विना तयारी मॅरेथॉनचे रजिस्ट्रेशन करतात आणि चीटिंग करून सर्टिफिकेट मिळवितात असे समजते.

या मुळे चीनमधील शेंजेंग मॅरेथॉन देशासाठी लाजिरवाणी ठरली होती कारण २५८ रनर्सनी ती चुकीच्या पद्धतीने पूर्ण केली. शेवटी त्यांच्यावर बंदी घालावी लागली तसेच अन्य २३७ रनर्सनी शोर्टकट घेऊन ती पूर्ण केल्याने त्याच्यावर २ वर्षे बंदी घातली गेली. येत्या १८ मे रोजी द्लीयान म्हणजे ग्रेट वॉल मॅरेथॉन होत असून धावपटूच्या असल्या बेईमानीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रथमच व्हिडीओ रेकोर्डिंग आणि फेस रेकग्नीझेशन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे आणि जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा केल्या जाणार आहेत.

Leave a Comment