सोनीचा १६ जीबी स्टोरेजसह ७५ इंची नवा टीव्ही भारतात सादर


भारतीय बाजारात सोनीने त्यांचा नवा ७५ इंची ४ के एचडीआर एलइडी अँड्राईड टीव्ही केडी ७५x९५०० जी नावाने सादर केला असून त्याची किंमत ४,४९,९०० रुपये आहे. हा टीव्ही एक्स ९५०० जी सिरीज मधील असून त्यात अनेक खास फीचर्स दिली गेली आहेत. यात गुगल असिस्टंट, एक्स १ अल्टीमेट प्रोसेसर, फुल अॅरे लोकल डीमिंग बॅक लाईट, अल्ट्रा वाईड व्ह्यू अँगल आणि नेटफ्लिक्स मोड याचा समावेश आहे.

या टीव्हीसाठी ब्लॅक फ्रेम आणि सिल्व्हर कलर स्टँड दिला असून हा टीव्ही अँड्राईड ओरिओ ८.० ला सपोर्ट करतो. त्याला १६ जीबी ऑन बोर्ड स्टोरेज दिले गेले आहे. तसेच ब्ल्यू टूथ व्हर्जन ४.२ ची कनेक्टिव्हिटीही आहे. ७५ इंची डिस्प्ले एक्स आय अल्टीमेट पिक्चर प्रोसेसर इंटेलिजन्ट प्रोसेसर आहे त्यामुळे चित्रातील प्रत्येक ऑब्जेक्ट ओळखून त्याची डिटेल मिळतात तसेच एक्सवाईड अँगल तंत्रज्ञानामुळे कोणत्याही अँगलने टीव्ही पहिला तरी कलर एकसमान दिसतात. नेटफ्लिक्स मोड मध्ये स्टुडीओ क्वालिटी पिक्चर, विविड, स्टँडर्ड, सिनेमा, गेम, ग्राफिक, फोटो, कस्टम, डॉल्बी, व्हिजन ब्राईट, व्हिजन डार्क अशी फीचर्स मिळतात. गुगल असिस्टंट फिचर सपोर्ट मध्ये इन बिल्ट मायक्रोफोनही आहे.

Leave a Comment