शिवसागर- अमूल्य वारसा जतन केलेले पर्यटनस्थळ


पूर्वोत्तर राज्यातील आसामची राजधानी गोहाटी पासून ३६० किमीवर असलेले शिवसागर हे आपल्या अमूल्य इतिहासाचा वारसा जतन केलेले एक सुंदर ठिकाण आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी ती पहिली हा इतिहास अधिक जिवंत होतो याचा अनुभव या ठिकाणी भेट दिल्यास नक्कीच येऊ शकेल. अहोम राज्वानाशाच्या अनेक खुणा येथे आजही आहेत. शिवाय नैसर्गिक सौंदर्य तर आहेच शिवाय अद्यापितरी येथे पर्यटकांची खूप गर्दी नाही.

येथील शिवसागर जलाशयावरून या ठिकाणचे नाव शिवसागर पडले आहे. १२९ एकर परिसरात हा जलाशय असून येथे नौकानयन, बोटिंगची मजा लुटता येते तसेच थंडीच्या दिवसात येथे गेल्यास अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात.

जयसागर हे येथील कृत्रिम सरोवर असून पूर्वोत्तर राज्यातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे. अहोम राजा स्वर्गदेव याने त्याच्या आईच्या स्मरणार्थ हे सरोवर बांधले असून त्याच्या काठावर तीन मंदिरे बांधली आहेत. पैकी मोठे केशव नारायण डोल फार सुंदर असून विष्णूला समर्पित आहे. त्याशिवाय सूर्य आणि गणेश मंदिरे आहेत. विष्णू मंदिरात विष्णू अवतारातील अनेक प्रतिमा कोरलेल्या आहेत.


रंगघर ही इमारत म्हणजे आशियातील सर्वत प्राचीन रंगशाळा मानली जाते. अहोम राजा स्वर्ग्देव प्रमत्तसिंग याने ही बांधली असून तिचा वापर राजपरिवाराच्या मनोरंजनासाठी होत असे. तसेच येथे रेडे, सांड यांच्या झुंजी होत असत आणि अन्य क्रीडाप्रकार होत असत. या इमारतीचे छत उलट्या केलेल्या नावेप्रमाणे दिसते.


शिवदोल हे येथील प्रसिध्द आणि पवित्र स्थळ असून पूर्वोत्तर राज्यातील सर्वधिक उंच शिवमंदिर आहे. याच परिसरात देवीदोल आणि विष्णूदोल अशी अन्य मंदिरेही आहेत. मंदिरांच्या भिंती आणि खांबांवर सुंदर कोरीव शिल्पे आहेत. त्यात प्रामुख्याने हिंदू देव देवता आहेत. महाशिवरात्रीला येथे खूप गर्दी होते.


नामदांग नदीवर ३०० वर्षपूर्वी एकाच दगडातून भांध्लेला छोटा पूल हे असेच आणखी एक आकर्षण. कारेंगघर आणि तालातल ही सात मजली प्राचीन इमारत असून याचे वरचे चार माजले कारेंग व खालचे तीन तालातल म्हणून ओळखले जातात. हे अहोम राजांच्या सैनिकांच्ये मुख्यालय. तलातल भागात दोन भुयारे असून ती डिखू नदीकाठी गरगाव महालाजवळ निघतात. युद्धकाळात हा गुप्त मार्ग म्हणून वापरला जात असे.

Leave a Comment