2 मे रोजी पुण्यात पाणीपुरवठा बंद


पुणे : पुढील दोन दिवस पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. त्याबाबतची सूचना पुणे पालिकेने दिली आहे. पुणे शहरातील गुरूवारी 2 मे 2019 रोजी काही तातडीच्या देखभालीनिमित्त पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाय, कमी दाबाने शुक्रवारी 3 मे रोजी पाणी पुरवठा होणार असल्यामुळे पुणेकरांना पुढील दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.

पुण्याच्या पाणीकपातीसाठी राज्यातील लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता बैठका सुरू झाल्या असल्यामुळे आता पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. पुण्याला सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 6 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शेती आणि शहराला याच धरणातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. आता 15 जुलैपर्यंत उपलब्ध पाणी पुरवावे लागणार आहे. आता अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधींच्या सहमतीने पुण्यात पाणी कपात करावी की नाही याबद्दल अंतिम निर्णय होणार आहे.

दरम्यान, आता तातडीच्या दुरूस्ती निमित्त पालिकेने दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात यापूर्वी सप्टेंबर 2018मध्ये खडकवासला कालवा फुटला होता. त्यामुळे मोट्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. यावेळी पालिकेच्या कारभारावर टीका देखील झाली होती. पण, पालिकेने आता मात्र याबाबत योग्य ती पावले उचलायला सुरूवात केल्यामुळे 2 आणि 3 मे रोजी पुण्यात दुरूस्तीची कामे होणार आहेत. परिणामी पुणेकरांना पुढील दोन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे.

Leave a Comment