उद्यापासून होत आहेत बरेच आर्थिक बदल


येत्या 1 मेपासून बरेच आर्थिक बदल होत असून त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर नक्की पडणार आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला त्या बदलांबाबत माहिती देत आहोत. जाणून घेऊयात मग कोणते बदल होत आहेत ते…

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक डिपॉझिट आणि कर्जाच्या व्याजदरात 1 मे म्हणजेच उद्यापासून बदल होत आहे. त्याच बरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट उद्यापासून लागू होत असल्यामुळे त्याचा परिणाम बँकेतील जमा आणि कर्जावरील व्याजदर नक्की होणार आहे. 1 मेपासून पंजाब नॅशनल बँक आपली डिजिटल वाॅलेट बंद करणार आहे. ग्राहकांनी त्यात जमा झालेले पैसे अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावेत, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

तुम्ही जर ट्रेनने प्रवास करणार असाल आणि तुम्हाला तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलायचे असेल तर तुम्ही त्यात 24 तास आधी बदल करू शकता. त्याचबरोबर 1 मेपासून तुम्ही आता एअर इंडियाचे तिकीट 24 तासात रद्द केले तर तुमच्याकडून कोणताही दंड आकारण्यात येणार नाही. गॅसच्या किमतीत 1 मेपासून वाढ होणार आहे. याआधी 1 एप्रिलपासून गॅसच्या किमतीत वाढ झाली होती. बिना सबसिडीच्या सिलेंडर्स 5 रुपयांनी वाढले आहेत.

Leave a Comment