हिमालयात आढळले हिममानवाच्या पावलाचे ठसे, भारतीय लष्कराकडून फोटो प्रसिद्ध


आपण आपल्या लहानपणी बर्फाळ प्रदेशातील हिममानवाविषयी ऐकलेच असेल आणि त्यावर आधारित चित्रपट देखील पाहिलाच असेल, पण अजून पर्यंत हा हिममानव पाहिला गेलेला नाही. त्यात हिमालयातील बर्फाळ प्रदेशात आता हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळले असून हे फोटो भारतीय लष्करानेच ट्विटरद्वारे प्रसिद्ध केल्यामुळे हिममानवाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.


९ एप्रिल रोजी मकालू बेस कॅम्प येथे भारतीय लष्कराच्या पथकाला रहस्यमय पावलांचे ठसे आढळले. हा परिसर नेपाळ- चीन सीमेजवळचा आहे. मानवी पावलासारखे हे ठसे दिसत असले तरी ३२ X १५ इंच इतका त्यांचा आकार होता. इतके मोठेया भागातील कोणत्याही प्राण्याच्या पावलांचे ठसे नसल्याने लष्कराचे पथकही संभ्रमात पडले होते. पण हे ठसे फक्त एकाच पायाचे आहेत. लष्कराने हे हिममानवाच्या पावलांचे ठसे असल्याची शक्यता वर्तवली आहे. यापूर्वीही मकालू- बारुन या भागात हिममानव दिसल्याचा दावा करण्यात आला होता.

Leave a Comment