‘मर्दानी2’मधील राणी मुखर्जीचा फर्स्ट लूक रिव्हील


अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाच्या सिक्वलमधून सफेद शर्ट, काळी पॅन्टं आणि ‘मर्दानी’ लूक घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच ‘मर्दानी2’ या चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. राणी मुखर्जी ही पुन्हा एकदा या चित्रपटात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. राणी मुखर्जीच्या या नव्या लुकची माहिती यशराज फिल्मने ट्विट करत चाहत्यांना दिली. तसेच ‘मर्दानी2’ या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु झाल्याचेही त्यात सांगितले. राणी मुखर्जी चित्रपटात 21 वर्षीय खलनायकांसह युद्ध करणार असल्याचेही बोलले जात आहे.


राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी’ चित्रपट 2014 साली आला. प्रेक्षकांकडून या चित्रपटात पोलिसाची भूमिका बजावलेल्या राणीला खूप दाद मिळाली. लहान मुलींची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेतील राणीने सगळ्यांची मने जिकंली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलाच पण त्याचबरोबर राणीच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. म्हणूनच यशराज फिल्म्सने या चित्रपटाचा सिक्वल आणण्याचा विचार केला आहे.

दिग्दर्शक गोपी पुथरन मर्दानी2 या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर या सीक्वलचा निर्माता राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा असणार आहे. हा चित्रपट 2019 च्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment