इन्स्टाग्रामच्या माध्यमातून समलैंगिक नसल्याचा जेम्स फॉकनरचा खुलासा


नवी दिल्ली – इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपण समलैंगिक नसल्याचा खुलासा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जेम्स फॉकनर याने केला आहे. फॉकनरने सोमवारी इन्स्टाग्रामवर ‘विथ बॉयफ्रेंड’ अशा कॅप्शनसह फोटो पोस्ट केल्यानंतर तो समलैंगिक असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.

जेम्स फॉकनरने सोमवारी संध्याकाळी त्याची आई आणि घनिष्ठ मित्रासोबत फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा फोटो बॉयफ्रेंड आणि आईसोबत बर्थडे डिनर अशा कॅप्शनसह पोस्ट केल्यामुळे फॉकनर समलैंगिक असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. अनेक समलैंगिकांनी त्याचे लैंगिकतेबद्दल मोकळेपणे बोलल्याबद्दल अभिनंदन केले होते. तर त्याच्या या धाडसाचे अनेकांनी कौतूक केले होते. प्रतिक्रियांचा रात्रभर ट्विटरवर, इन्स्टाग्रामवर पाऊस पडत होता. पण अखेर सकाळी या चर्चेला खुद्द फॉकनरनेच पूर्णविराम दिला.

Leave a Comment