लवकरच बलात्कारी आसाराम बापूवर बायोपिक!


बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळापासून बायोपिकचा ट्रेण्ड सुरु आहे. आतापर्यंत या ट्रेण्डमध्ये अनेक व्यक्तींच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात आली आहे. या बायोपिकमधून क्रीडापटूंपासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेकांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला. त्यातच आता लवकरच बलात्कार प्रकरणी दोषी असणाऱ्या आसाराम बापूवर बायोपिक करण्यात येणार आहे. या बायोपिकची निर्मिती बॉलिवूड निर्माते सुनील बोहरा हे करणार आहेत.

सुनील बोहरा पत्रकार उशीनर मजूमदार यांनी लिहिलेल्या ‘गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’ या पुस्तकावर चित्रपट तयार करणार आहेत. या चित्रपटाच्या राईट्सचीही सुनील यांनी खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे.

मी उशीनर मजूमदार यांनी आसारामवर लिहीलेले पुस्तक वाचले आहे. पी.सी. सोलंकी यांनी पीडित मुलीचा खटला पैसे न घेतला कसा लढविला होता हे देखील या पुस्तकात वाचले. हा खटला जिंकत पी.सी. सोलंकी यांनी पीडित मुलीला न्याय मिळवून दिला होता. मी त्यांच्या या कामामुळे प्रचंड प्रभावित झालो आणि त्या क्षणी आसारामवर बायोपिक करण्याचा निर्णय घेतला. मला या खटल्याशी संबंधीत जोधपूर आणि सूरत कारागृहातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही प्रेरित केले, असे सुनील बोहरा यांनी सांगितले.

Leave a Comment