अजय सिंह देओलचा उमेदवारी अर्ज दाखल


चंदीगड (पंजाब)- काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलने प्रवेश केला होता. पंजाबमधील गुरुदासपूर येथील लोकसभेचे तिकीट प्रवेश करतचा त्याला मिळाले. त्यानंतर सनी देओलने सोमवारी म्हणजे 29 एप्रिलला गुरुदासपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचा भाऊ बॉबी देओलही यावेळी उपस्थित होता. संपत्तीची माहितीही सनी देओलने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सादर केली आहे.

तसे क्वचितच लोकांना सनी देओलचे खरे नाव माहित असेल. ‘अजय सिंह’ हे सनीचे खरे नाव आहे. या संबंधी सनीने प्रतिज्ञापत्रात ठळकपणे उल्लेख केला आहे. त्याला भारतासह जगभरातील लोक ‘सनी देओल’ या नावानेच ओळखतात. पण, त्याचे खरे नाव वेगळे असल्याचे प्रतिज्ञपत्रातून समोर आले आहे.

निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीच्या माहितीनुसार, सनी देओलकडे 87 कोटी 18 लाख रुपयांची एकूण संपत्ती आहे. त्यात जंगम मालमत्ता 60 कोटी 46 लाख रुपयांची, तर स्थावर मालमत्ता 21 कोटी रुपयांची आहे. तसेच, 50 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही सनी देओलने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. सनीकडे 26 लाख रुपये, तर पत्नीकडे 16 लाख रुपये कॅश आहेत. 1 कोटी 69 लाख रुपयांची वाहने सनी देओलकडे आहेत. त्यासोबतच पत्नीकडे 1 कोटी 56 लाखांचे दागिने आहेत, मात्र सनी देओलकडे दागिने नाहीत, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Leave a Comment