हिटलरचे सर्वात घातक अस्त्र ठरला होता हा फोन


जर्मनीचा हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलर याचा मृत्यू झाला त्याला ७४ वर्षाचा काळ लोटला आहे. हिटलर आणि त्याची पत्नी एवा यांनी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यावर बर्लिन मधील बंकर मध्ये गोळी घालून घेऊन आत्महत्या केली होती ती ३० एप्रिल १९४५ साली. त्यानंतर हे बंकर पेटवून दिले गेले होते मात्र त्यातून एक वस्तू वाचली आणि ती म्हणजे हिटलर वापरत असलेला त्याचा खासगी फोन. हा फोन हिटलरचे सर्वाधिक घातक शस्त्र ठरला कारण या फोनवरून हिटलरने लाखो ज्यू लोकांना ठार करण्याची फर्माने वेळोवेळी दिली होती.

या फोनची कहाणी अशी, हा फोन मूळ काळ्या रंगाचा होता तो नंतर लाल रंगाने रंगविला गेला होता. त्याच्यावर हिटलर अशी अक्षरे आणि हिटलर ज्या राष्ट्रीय जर्मन कामगार पार्टी म्हणजे नाझीचा प्रमुख होता त्या पक्षाचे चिन्ह काढले गेले होते. हा फोन २०१७ मध्ये अलेक्झांडर हिस्टोरिकल ऑक्शन ने लिलाव केला तेव्हा त्याला २ लाख ४३ हजार डॉलर्स अशी विक्रमी किंमत मिळाली. हा फोन कुणी खरेदी केला त्याचे नाव जाहीर केले गेले नाही.


लिलावापूर्वी हा फोन ब्रिटीश ब्रिगेडियर सर राल्फ रायनर यांच्याकडे होता. हिटलर ठार झाला आणि तो राहत असलेल्या बंकरला आग लावली गेली तेव्हा एका रशियन अधिकाऱ्याने हा फोन राल्फ यांच्या बर्लिन भेटीत त्यांच्याकडे दिला. राल्फ यांनी हा फोन सुटकेस मधून मायदेशी म्हणजे ब्रिटनला आणला पण त्यांच्यावर लुट केल्याचा आरोप होईल या भीतीने त्यांनी या फोनची माहिती कुणालाच दिली नाही. नंतर त्यांनी त्यांच्या मृत्युपूर्वी म्हणजे १९९० साली या फोनची माहिती त्यांचा मुलगा रायन याला दिली. तेव्हा त्याने हिटलरच्या स्वीच बोर्ड ऑपरेटर ला शोधून हा फोन त्याला दाखवून हा हिटलरचाच फोन आहे याची खातरजमा करून घेतली होती. याच फोनवरून काँस्न्ट्रेशन कँप मध्ये कोंडलेल्या ज्यू लोकांच्या मृत्यूची फर्माने, सैनिकी ऑर्डर रोज देत असे. त्याने याच फोनवरून त्याचा मेहुणा जनरल हर्मन याच्या मृत्यूचे आदेश दिले होते असे इतिहास सांगतो.

Leave a Comment