लाखो रानमांजरांच्या जीवावर उठलेय ऑस्ट्रेलिया सरकार


मांजरे ज्यांच्या जीव कि प्राण आहेत अश्या मांजरप्रेमींमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया सरकारविषयी खूप चर्चा सुरु आहे आणि याचे कारण आहे ऑस्ट्रेलियन सरकारने हाती घेतलेली एक मोहीम. या मोहिमेनुसार ऑस्ट्रेलियन सरकार तब्बल २० लाख जंगली मांजराना विष घालून ठार करणार आहे. सरकारच्या हजारो हेक्टर जंगल जमिनीवर ही मांजरे असून त्यांची संख्या वाढत चालली आहे. दुसरे म्हणजे ही मांजरे सुमारे २० प्रजातीच्या सस्तन प्राण्यांसाठी धोक्याची ठरली आहेत कारण ही मांजरे या सस्तन प्राण्यांना मारून खातात व त्यामुळे या प्रजाती नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे.


यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार सॉसेजेसचा वापर करणार आहे. या सॉसेजेसमध्ये कांगारूंचे मास, चिकन फॅट, वनौषधी, मसाले आणि विष घातले गेले आहे आणि हे पदार्थ विमानांमधून जंगल भागात टाकले जाणार आहेत. प्रती किलोमीटर साठी अशी ५० पाकिटे टाकली जातील. या रानमांजरांनी ऑस्ट्रेलियातील मूळ प्राणी प्रजातींना धोका निर्माण केला आहे कारण दरवर्षी ही मांजरे ३ कोटी ७७ लाखांपेक्षा अधिक पक्षी आणि ६ लाखाहून अधिक सरपटणारे प्राणी खून टाकत आहेत.


अर्थात ऑस्ट्रेलिया सरकारच्या या मोहिमेला सोशल मिडीयावर बराच विरोध केला जात असून या निर्णयविरोधात डझनावारी याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. त्यात सरकार सारा दोष मांजरावर टाकून शहरीकरण, लॉगिंग, खाणी या सारख्या कारणांमुळे जैवविविधतेला होत असलेले नुकसान का लक्षात घेत नाही असा सवाल केला जात आहे.

Leave a Comment