दीपिका पदुकोनने मतदान करून टीकेला दिले उत्तर


यंदाच्या लोकसभा निवडणुकातील चौथ्या टप्प्याचे मतदान काल पार पडले आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काल अनेक सेलेब्रिटीनी त्याचा मतदान हक्क बजावला असल्याचे फोटो शेअर केले. यात सर्वात नवलाचे ठरले दीपिका पदुकोन हिचे फोटो. कारण निवडणुकीपूर्वी जे बॉलीवूड तारे भारताचे नागरिक नसल्याने मतदान करू शकत नाहीत त्यात दीपिकाचे नाव होते. यावरून तिच्यावर टीका केली गेली होती. मात्र सोमवारी दुपारी पांढरा ढगळ शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये सुरक्षा रक्षकांसह दीपिकाचे मतदान केंद्रावर आगमन झाले, तिने मतदान केले आणि शाई लावलेल्या बोटासह सेल्फी शेअर केला. याचबरोबर तिने एक कॅप्शन टाकून तिच्या टीकाकारांची चांगलीच जिरविली.

फोटोसोबत दीपिका लिहिते, मी कोण आणि कुठली आहे याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. मात्र त्याबाबत ज्यांच्या मनात शंका आहे त्यांना सांगते कृपया गोंधळू नका. जय हिंद. प्राउड टुबी इंडियन.

दीपिकाचा जन्म डेन्मार्क येथे १९८६ साली झाला असला तरी ती एक वर्षाची होत असतानाच तिचे वडील प्रकाश पदुकोन भारतात परतले आणि बंगलोर येथे स्थायिक झाले होते. दीपिकाने तिच्याकडे भारतीय पासपोर्ट असल्याचे सांगितले आहे. तिचा पती रणवीर हाही मतदानासाठी स्वतंत्रपणे आला तेव्हा त्याच्यासोबत त्याचे वडील जगजीतसिंग भवनानी हे होते. त्यानेही मतदान केल्याचा फोटो शेअर केला आहे.

Leave a Comment