बांबूच्या लाकडाचा वापर करुन बनवली जगातील पहिली 100% इलेक्ट्रिक कार


जगातील पहिली 100% इलेक्ट्रिक कार क्लासिक फोर्ड ब्रोन्कोला झीरो लॅब ऑटोमोटिव्हने जगासमोर आणले आहे. 1966-77 मॉडेलवर बेस्ड ही कार आहे. अकरोड आणि बांबूच्या लाकडाचा वापर याच्या इंटीरिअरमध्ये करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या हाताने या कारचे इंटीरिअर बनवले आहे. ही कार पूर्णपणे एन्वायरमेंट फ्रेंडली आणि लो-मेंटेनेंस कार आहे.

कोणत्याही सुपीरिअर लक्झरी कारसारखी ही कार फील देते. कार्बन फायबरचा वापर कारच्या बॉडी पॅनलला बनवण्यासाठी केला आहे. ऑल इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टीम या प्रीमियम इलेक्ट्रिक कारमध्ये आहे. इलेक्ट्रिक क्लासिक फोर्ड ब्रोन्कोमध्ये 70 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 300 किलोमीटरचे अंतर ही कार कापते. यावरून इलेक्ट्रिक मोटरच्या पॉवरचा अंदाज लावता येतो की, या गाडीत यामध्ये 369 हॉर्स पॉवरच्या इंजिन आहे. त्यासोबतच 240 Nm टॉर्क प्रोड्यूस करण्यासाठी ही कार सक्षम आहे.

अकरोड आणि बांबूच्या लाकडाचा वापर याच्या इंटीरिअरला बनवण्यासाठी केला आहे, जे पूर्णपणे हँडमेड आहे. त्यासोबतच इंटीरिअरमध्ये लेदरची फिनिशिंग दिली आहे. कंपनी फोर्ड ब्रोन्को प्रीमियम इलेक्ट्रिक व्हीकलच्या फर्स्ट एडिशनमध्ये फक्त 150 यूनिटच बनवेल.

Leave a Comment